Lok Sabha Election 2024 : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक – क्षीरसागर

मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने १५ मे २०२४ अखेर दाखल ३० प्रकरणे प्रमाणित करून दिली आहेत.

109
Lok Sabha Election 2024 : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - क्षीरसागर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची आठवी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – मथुरा, वाराणसीत मंदिरे उभारण्यासाठी भाजपाला ४०० पार करा; Himanta Biswa Sarma यांचे आवाहन)

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, समिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, समाजमाध्यम तज्ञ प्रा अभिजित पाटील, प्रसाद कुलकर्णी, माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी वैशाली त्रिवेदी, स्वतंत्र पत्रकार/माध्यम तज्ञ- राजेंद्र हुंजे, पंकज दळवी, मनिषा रेगे, दीपक चव्हाण, गोपाळ साळुंखे, श्रद्धा मेश्राम, जयश्री कोल्हे, वैदेही खडसे तसेच सदस्य सचिव तथा माध्यम समन्वयक केशव करंदीकर हे उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ने १५ मे २०२४ अखेर दाखल ३० प्रकरणे प्रमाणित करून दिली आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.