लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार देशभरार रंगात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभा जागोजागी होत आहेत, या सभांमध्ये मात्र आरोप – प्रत्यारोप करताना जात, धर्म, समुदाय आणि भाषा यावरून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी आणि कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात नोटिस जारी केली आहे.
काही दिवसापूर्वी, राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये देशाची संपत्ती वाटू शकते. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने प्रत्युत्तरात म्हटले की, पंतप्रधानांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या मुद्द्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
(हेही वाचा Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईत महिलांना प्रतिनिधित्व नाही )
२६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशभरात प्रचार जोरदार सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे देशभरात दौरे सुरू आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून २९ एप्रिलपर्यंत उत्तर मागवले आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ७७ अंतर्गत ‘स्टार कॅम्पेनर’चा दर्जा देणे हे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या कक्षेत आहे आणि स्टार प्रचारकांनी उच्च दर्जाच्या भाषणात योगदान देणे अपेक्षित आहे.
Join Our WhatsApp Community