आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या (Inspectors of Police, Assistant Inspectors, Sub-Inspectors) बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश सोमवारी (१५ जानेवारी) रात्री उशिरा काढले आहेत.
शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षक, १९ सहायक पोलीस निरीक्षक आणि ७६ पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पोलीस महासंचालकांच्या (Director General of Police) आदेशानुसार मूळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Rahul Narvekar : ‘… म्हणून निकाल चुकीचा ठरत नाही’ ; ठाकरे गटाच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे चोख उत्तर)
Join Our WhatsApp Community