- ऋजुता लुकतुके
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी एकाही पक्षाला आणि खासकरून अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचा परिणाम मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. दिवसभरातील मोठ्या चढ उतारानंतर अखेर दुपारी साडेतीन वाजता शेअर बाजार बंद होताना निफ्टी निर्देशांक १,३७९ अंशांनी कोसळून २१,८८४ वर बंद झाला. तर सेन्सेक्समध्येही तब्बल ४.३९० अंशांची घसरण झाली. (Lok Sabha Elections 2024)
निकाल जसजसा स्पष्ट होत गेला तसे दिवसभरात फक्त ११० शेअर हे हिरव्या रंगात म्हणजे कालच्या तुलनेत वर होते. तर २,२०७ शेअर हे लाल रंगांत बंद झाले. सगळ्यात जास्त नुकसान अदानी समुहाच्या शेअरमध्ये झालं. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या दोन शेअरमध्ये दुपारच्या सत्रात दोनदा लोअर सर्किट लागलं. (Lok Sabha Elections 2024)
Indian shares plunged in early trade despite the initial lead of Prime Minister Narendra Modi’s Bharatiya Janatha Party-led National Democratic Alliance as vote counting progressed in the world’s largest democracy.#Forbes
For more details: 🔗 https://t.co/yQjx6o5OdE pic.twitter.com/idExXKDnyh
— Forbes Middle East (@Forbes_MENA_) June 4, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष)
मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीचे कल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने होते. पण, तरीही शेअर बाजाराचा कल उतरणीचाच होता. हळू हळू रालोआकडे आघाडी असली तरी इंडी आघाडीही दोनशेपार गेली आणि तिथून शेअर बाजाराचा कल आणखी स्पष्ट होत गेला. (Lok Sabha Elections 2024)
भारतीय जनता पार्टीच्या जवळ असलेले उद्योजक अदानी आणि अंबानी तसंच भाजपा सरकारचे महत्त्त्वाचे प्रकल्प असलेल्या बांधकाम कंपन्या, सिमेंट कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या, सरकारी कंपन्या या सगळ्यांवर आज दडपण दिसून आलं. अदानी पोर्ट्स कंपनीचा शेअर ३३५ अंशांनी खाली येऊन सोमवारी १,२४८ वर स्थिरावला. तर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर तब्बल ७३१ अंशांनी कोसळून २,९४१ वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरही अंशांनी खाली येऊन २,७९४ वर बंद झाला. (Lok Sabha Elections 2024)
फक्त शेअर बाजारच नाही तर धातू आणि चलन बाजारावरही लोकसभेच्या निकालाचा परिणाम जाणवत होता. धातू बाजारातही सोने, चांदी, तांबं या महत्त्वाच्या धातूंमध्ये सुरुवातीला घसरणीचाच माहौल होता. शेअर बाजारातील अनिश्चितता आणखी दोन दिवस तरी कायम राहील आणि निफ्टी निर्देशांक २०,००० पर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community