सध्या देशभरातील राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर आता देशाला लोकसभा निवडणुकीचे (Election Commission) वेध लागले आहेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालयांतर्गत पत्र सोशल मीडियात प्रसारित झाले. त्यामध्ये लोकसभा निवडणूक साधारण १६ एप्रिल २०२४ असेल, असे म्हटले आहे. त्यावर माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्यावर आयोगाने (Election Commission) त्यावर आता खुलासा केला.
दिल्ली निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार आगामी लोकसभा निवडणूक १६ एप्रिल रोजी होणार असल्याची चर्चा सोशल माध्यमांत रंगली आहे. त्यावर, आता दिल्ली निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिले. १६ एप्रिल २०२४ या तारखेचा उल्लेख केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक योजनांसंदर्भातील कार्यक्रमाची तयारी करण्याच्या अनुषंगाने करण्यात आला आहे, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे, या पत्रकानुसार जो संभ्रम निर्माण झाला होता, तो दिल्ली निवडणूक आयोगाकडून दूर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community