Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन!

241
Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन!
Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन!

पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala Bhushi Dam) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. (Lonavala Bhushi Dam)

आनंदाच्या भरात हे लोक पाण्यात जातात आणि…

लोणावळ्यातल्या दुर्घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल पाटील म्हणाले, लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरसात ही घटना घडली आहे. हडपसर येथील लियाकत अन्सारी आणि युनुस खान आणि त्यांचे 17 ते 18 जणांचे कुटुंब वर्षाविहाराकरता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकुण 10 जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले. त्यापैकी पाच जणांना पाण्याचे प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आले परंतु उर्वरीत पाच जण पाण्याचे प्रवाहात वाहून गेले.चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एक व्यक्ती बेपत्ता असून शोध सुरू आहे. राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वर्षा पर्यटनासाठी जातात आणि आनंदाच्या भरात हे लोक पाण्यात जातात आणि अशा घटना घडतात. असं ते म्हणाले. (Lonavala Bhushi Dam)

निर्जनस्थळी जाऊन जीवन धोक्यात घालू नये

या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहाराकरता येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहाराकरता येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहारा करता येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपले कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे. (Lonavala Bhushi Dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.