जगभरातील हवामान बदलांबाबत चिंता व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अनेक देशांना इशारा दिला आहे. मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे बदलांच्या संकटाशी सामना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे संकट आहे.
( हेही वाचा : MPSC मार्फत ८ हजार १६९ पदांसाठी मेगाभरती! अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)
‘समुद्राच्या पातळीत वाढ- आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’
समुद्राच्या वाढच्या पातळीमुळे अनेक शहरं, सखल भाग आणि देशांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ शकते यामुळे यूएन सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ- आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
या शहरांना धोका
समुद्राची पातळी वाढण्याची सरासरी अलिकडच्या दोन शतकांमध्ये वाढली आहे. समुद्राच्या या वाढत्या पातळीमुळे जवळपास सर्वच खंडातील मोठ्या शहरांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यामध्ये कैरो, लागोस, मापुटो, बॅंकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉय एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागोसारख्या मोठ्या शहरांना यामुळे धोका आहे असेही संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community