- खास प्रतिनिधी
मुंबईतील बेस्ट उपक्रमातर्फे चालवण्यात येणाऱ्या मिनी वातानुकूलित बसेस या कंत्राटी पद्धतीवर चालवल्या जात असून गेल्या काही महिन्यात कंत्राटदारांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. (BEST)
उद्देश चांगला
मुंबईत मिनी वातानुकूलित बसेस खासगी कंत्राटदारांकडून चालवल्या जातात. मिनी बसेस चालवण्याच्या निर्णयाचे स्वागत तज्ञांकडून करण्यात आले कारण या बसेस चालवण्यामागचा उद्देश प्रवाशांना दिलासा देणे हा होता. मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्टेशनपासून कमी म्हणजेच साधारण ७-८ किमी अंतरापर्यंत या बसेस जलद गतीने मार्गक्रमण करत असल्याने प्रवाशांचा वेळ वाचतो. तसेच वातानुकूलित प्रवास असल्याने प्रवाशांना कमी दरात चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकते, हा यामागचा उद्देश होता. (BEST)
(हेही वाचा – Anant Chaturdashi : एकाच दिवशी ३६३ मेट्रिक कचरा, तर उत्सवात ५०० टन निर्माल्य झाले जमा)
मात्र, गेल्या काही महिन्यात असे लक्षात आले की, या बसमधील वातानुकूलित यंत्रणा कायम बंद असते मात्र तिकीट वातानुकूलित प्रवासाचे घेतले जाते. ही एकप्रकारे प्रवाशांची लूट असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. या बसेसची योग्य प्रकारे देखभाल होत नसून अत्यंत वाईट स्थितीत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. (BEST)
सगळ्याच बसेसची वातानुकूलित यंत्रणा बंद
शशांक विरकुड हे दररोज मुंबई उपनगरातील माजास डेपो ते आगरकर चौक या ४४१ क्रमांकाच्या बस रूटवर किंवा माजास डेपो ते जोगेश्वरी स्टेशन ४४२ या रूटवर प्रवास करतात. “या रूटवर मिनी वातानुकूलित बसेस कमी दरात चालवल्यामुळे प्रवाशांची नक्कीच सोय होत होती. मात्र सद्या या बसेसची नीट काळजी घेतली जात नाही, वातानुकूलित तर सगळ्याच बसेसचा बंद असतो पण तिकीट वातानुकूलित प्रवासाचे आकरले जाते. एकीकडे बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटदाराला वातानुकूलितचे पैसे दिले जात असतीलच आणि वर कंत्राटदायर प्रवाशांकडूनही वातानुकूलितचे भाडे आकारात असेल तर कंत्राटदाराला दोन्ही कडून फायदा आणि यात प्रवाशांची लूट होते,” असा मुद्दा विरकुड यांनी मांडला. (BEST)
(हेही वाचा – Central Government: ‘चांद्रयान-४’ मोहिमेसाठी २ हजार १०४ कोटींची तरतूद! मंत्रिमंडळाची मंजुरी)
कंत्राटदाराची जबाबदारी
‘वेट भाडेतत्त्वा’खाली बसेस बेस्टच्या ताफ्यात असल्या तरी त्या ‘बेस्ट’च्या मालकीच्या नाहीत. खाजगी कंत्राटदार उत्पादकाकडून या बसेसची खरेदी करण्यात आली आणि त्याचे संचालन आणि देखभालीची काळजी घेण्याची तसेच कर्मचारी भरती आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची आहे. दररोज बस फेऱ्या आणि किती किलोमीटर धावते त्यानुसार, पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी ‘बेस्ट’कडून कंत्राटदाराला पैसे देण्यात येतात.
बेस्टचा ताफात गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. २०१०-११ मधील ४,३८५ बस ताफा होता तो आता २०२४ मध्ये कमी होऊन १,०७० पर्यंत खाली आला आहे. खाजगी कंत्राटदारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कंत्राटी बस ताफ्यात सुमारे २,००० बसेस आहेत, असे सांगण्यात आले. (BEST)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community