विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून महत्वाच्या योजना जाहीर होऊ लागल्या आहेत. म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या लॉटरीनंतर कोकण मंडळाची लॉटरी काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. मंडळामार्फत दोन लॉटरी काढण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या लॉटरीची जाहिरात 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला (MHADA) प्राप्त झालेल्या 913 घरांचा समावेश करण्यात आला आहे. यात ठाणे, टिटवाळा, वसई परिसरातील घरांचा समावेश असेल.
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी कोकण म्हाडा योजनेतील सुमारे 7 हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 8 हजार घरांची ही लॉटरी असेल. या घरांच्या किमती 20 लाखांच्या जवळपास असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना परवडणारी ही घरे असणार आहेत. (MHADA)
(हेही वाचा-Ujjain Mahakal Temple: महाकाल मंदिरातील भिंत कोसळली! दोघांचा मृत्यू, दोन जखमी)
नुकत्याच पार पडलेल्या लॉटरीतून म्हाडाच्या 2030 (MHADA) सदनिकांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी तब्बल 1 लाख 34 हजार 350 अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. पात्र ठरलेल्या अर्जदारांना आता प्रतिक्षा आहे ती म्हाडाच्या या सोडतीची. ही सोडत 8 ऑक्टोबर 2024 रोजी दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community