मुंबईत घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र तेवढी मिळकत नसल्यामुळे अनेकांचे आयुष्यभर हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र अशा इच्छूकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने मुंबईत तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील तीन हजार 015 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार 683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
कुठे आहेत घरे?
विशेष म्हणजे कोरोनाच्या मागील २ वर्षांत आणि त्याही आधी १ वर्षानांत म्हणजे तब्बल ३ वर्षांत म्हाडाने मुंबई एकही लॉटरी काढली नाही. आता म्हाडाने आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीत म्हाडा मुंबईतील ४ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज मागवले जाणार आहेत. यानंतर अर्जांची छाननी करुन दिवाळीत प्रत्यक्षात सोडत काढण्यात येणार आहे. गोरेगाव, अॅन्टॉप हिल, विक्रोळीसह मुंबईत अनेक ठिकाणी म्हडाची ही घरे उपलब्ध होणार आहेत. या लॉटरीमध्ये अल्प आणि अत्यल्प गटातील घरांचा समावेश असणार आहे. म्हाडाकडून सोडतीची तयारी देखील सुरु झाली आहे. लवकरच म्हाडातर्फे या लॉटरीबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना परवडणारी घरे
मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. यामुळे मुंबई सारख्या शहरात आपले हक्काचे घर असाव असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हडाची लॉटरी मोठा आधार ठरते. म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत अनेक सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. प्रायव्हेट बिल्डर पेक्षा म्हाडाने तयार केलेल्या घरांच्या किमंती या सर्वसमान्यांना परवडणाऱ्या अशा असतात. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.
Join Our WhatsApp Community