गरबा-दांडियासाठी डीजे,लाऊडस्पीकरची गरज नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

नवरात्रोत्सवात दांडिया किंवा गरबा खेळणं ही जुनी परंपरा आहे. त्यासाठी लाऊडस्पीकर किंवा डीजे लावून गरबा किंवा दांडिया खेळला जातो. पण याचबाबत आता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गरबा,दांडियासाठी डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर करण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचा निर्णय

नवरात्रोत्सवात आदिशक्तीची पूजा अर्चना करण्यात येते. त्यासाठी एकाग्रतेने ध्यानधारणा करावी लागते आणि ध्यान करणे हे गोंगाटात शक्य नाही. त्यामुळे गरबा किंवा दांडियासाठी अत्याधुनिक डीजे किंवा लाऊडस्पीकर लावण्याची गरज नाही. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी भक्तांच्या पूजेत व्यत्यय येत असेल किंवा स्वतः भक्त व्यत्य आणण्याचा प्रयत्न करत असेल तर देवीची पूजा होऊ शकत नाही, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

(हेही वाचाः 67 पॉर्न वेबसाईट्स होणार ब्लॉक, केंद्र सरकारची मोठी कारवाई)

पारंपारिक पद्धतीने साजरा करा उत्सव

दांडिया आणि गरबा हे धार्मिक उत्सवाचा अंगभूत भाग आहेत. त्यामुळे आजही ते पूर्णपणे पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने साजरे केले जाऊ शकतात, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. ध्वनीप्रदूषण नियम 2000 अंतर्गत शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या खेळाच्या मैदानावर दांडिया,गरबा खेळला जात असल्याने तिथे साऊंड सिस्टिमचा वापर करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणा-या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. त्यावेळी निकाल देताना न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी नवरात्रीतीतल पूजेचे महत्व स्पष्ट कले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here