Love Jihad : धर्मांध वासीफच्‍या छळाला कंटाळून हिंदु युवतीची आत्‍महत्‍या

ही तरुणी ‘बी.एस्.सी.’चे शिक्षण घेत होती, तर महंमद हा दिल्लीत वाहन चालकाचे काम करतो. ३ ऑगस्‍टला मुलीच्‍या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्‍यानंतर महंमदच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

272
उत्तर प्रदेशातील मैनपूरी येथे २९ जुलैला एका हिंदु युवतीने आत्‍महत्‍या केली. महंमद वासीफ अन्‍सारी नावाच्‍या धर्मांधाने तिच्‍यावर इस्‍लाम स्‍वीकारण्‍यासाठी दबाव आणला (Love Jihad) होता. इस्लाम स्वीकारण्यास तिने नकार दिल्याने तिची अश्‍लील छायाचित्रे सोशल मीडियात प्रसिद्ध करण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्‍यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली. वसीफच्या छळाला कंटाळून तिने रहात्‍या घरी गळफास लावून आत्‍महत्‍या केली.
ही तरुणी ‘बी.एस्.सी.’चे शिक्षण घेत होती, तर महंमद हा दिल्लीत वाहन चालकाचे काम करतो. ३ ऑगस्‍टला मुलीच्‍या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्‍यानंतर महंमदच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. मैनपुरीचे पोलीस आयुक्‍त विनोद कुमार यांनी ‘एक्‍स’वर सांगितले की, आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्‍यात आले आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या वडिलाने तक्रारीत म्हटले आहे की, माझ्‍या मुलीने घरनाजपूर परिसरातील रहिवासी वसीफ अन्‍सारी याची कृत्‍ये आम्‍हाला सांगितली होती. केवळ बदनामीच्या भीतीने मी स्‍थानिक पोलिसांशी संपर्क साधला नाही. मी या प्रकरणाची तक्रार वसीफचे वडील अस्‍लम आणि भाऊ सलीम यांच्‍याकडे केली असता त्‍यांनी मलाच शिवीगाळ केली आणि सांगितले की, वसीफचा विवाह माझ्‍या मुलीशीच होईल. वासिफने माझ्‍या मुलीला धमकावल्‍यामुळेच तिने आत्‍महत्‍या केली. (Love Jihad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.