लव्ह जिहाद : आफताबने हत्या केलेली हिंदू युवती होती गर्भवती?

हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यानंतर हत्या करून शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबच्या विरोधात देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज या प्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. यामध्ये आफताबकडून संबंधित युवती गर्भवती होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे, ओप इंडिया या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तामध्ये असे म्हटले आहे.

व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठावर सुरु आहे तपासणी 

पोलीस सध्या आफताबची कसून चौकशी करत आहेत, परंतु तो पोलिसांना सहकार्य करत नाही, पोलिसांना संभ्रमित करत आहे. मात्र त्याच्या एकूण वर्तनातून पोलिसांना या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी आढळून येत आहेत. पोलीस १८ मे २०२२ रोजी त्या हिंदू युवतीचे व्हाट्स ऍप चॅटिंग तपासत आहेत. ज्या दिवशी युवतीची हत्या झाली, त्या दिवसाचे हे चॅटिंग पोलीस विशेष लक्षपूर्वक तपासत आहेत. यावरून हत्येच्या वेळी हिंदू युवती ही गर्भवती होती, असा दिल्ली पोलिसांना संशय आला आहे. पण हत्येनंतर इतक्या महिन्यांनी तिची गर्भधारणा हाडांवरून निश्चित करणे कठीण असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस आता यासंबंधीच्या माहितीसाठी ठोस पुरावे चॅटिंगच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर तिने केलेल्या संवादानुसार जमा करत आहेत.

(हेही वाचा वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानाबाबत पोलिसात तक्रार करणार)

युवतीने दिलेली कबुली  

मराठी अभिनेत्री संगीता पाटील आणि सागरिका सोना सुमन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती सुमारे एक वर्षापूर्वी गरोदर होती. तिला आफताबशी विवाह करून त्या मुलाला आफताबचे नाव द्यायचे होते. एक वर्षापूर्वी मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना त्या युवतीची संगीत पाटील आणि सागरिका सोना सुमन यांची भेट झाली होती. सुमनच्या म्हणण्यानुसार, ‘त्या युवतीने ३-४ लोकांना सांगितले होते की,  ती गर्भवती आहे आणि तिला आफताबशी लग्न करायचे आहे, त्यानंतर तिच्या पोटात असलेल्या बाळाला जन्म द्यायचा आहे.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here