लग्न करण्याची मागणी करताच अत्याचार
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून पीडित तरूणी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फूस लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा शपथ पत्रावर करार केला. करारानंतर हे पुढे ते दोघे दोन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने लग्नासाठी मागणी केल्यावर आरोपी असलेला साजिद खान पठाण याने पीडित मुलीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. पीडित मुलीने धर्मांतरासाठी विरोध केल्याने त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
(हेही वाचा शरद पोंक्षेंचे थेट सेल्युलर जेलमधून राहुल गांधींना आव्हान, एक दिवस तरी सावरकरांच्या यातना भोगून दाखव!)
Join Our WhatsApp Community