हिंगोलीतही ‘आफताब’; हिंदू तरुणीला धर्मांतर करण्यासाठी केले अत्याचार

धर्मांध, विकृत मुसलमान आफताबने प्रेमाच्या जाळ्यात फसवल्या हिंदू तरुणीचे ३५ तुकडे करून तिची हत्या केली, याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. हे प्रकरण तापलेले असतानाच हिंगोलीत आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आरोपी साजिद पठाण याने हिंदू तरुणीला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे तरूणीनी पठाणच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.  तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

लग्न करण्याची मागणी करताच अत्याचार 

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून पीडित तरूणी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फूस  लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा  शपथ पत्रावर करार केला. करारानंतर हे पुढे ते दोघे दोन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने लग्नासाठी मागणी केल्यावर आरोपी असलेला साजिद खान पठाण याने पीडित मुलीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.  पीडित मुलीने धर्मांतरासाठी विरोध केल्याने त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली.  त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार  केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा शरद पोंक्षेंचे थेट सेल्युलर जेलमधून राहुल गांधींना आव्हान, एक दिवस तरी सावरकरांच्या यातना भोगून दाखव!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here