केरळमध्ये Love jihad मुळे ४०० मुली बेपत्ता झाल्या; भाजपा नेत्याचा धक्कादायक दावा

54
केरळमध्ये Love jihad मुळे ४०० मुली बेपत्ता झाल्या; भाजपा नेत्याचा धक्कादायक दावा
केरळमध्ये Love jihad मुळे ४०० मुली बेपत्ता झाल्या; भाजपा नेत्याचा धक्कादायक दावा

केरळमध्ये (Kerala) लव्ह जिहादची (Love jihad) प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत, असा दावा करणारा ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात लव्ह जिहादची (Love jihad) प्रकरणे वाढत आहेत का? अशी चर्चा घडली होती. आता केरळमधील भाजपाचे नेते आणि पुंजर विधानसभेचे माजी आमदार पीसी जॉर्ज (P C George) यांनी पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा मांडला आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना पीसी जॉर्ज (P C George) म्हणाले की, लव्ह जिहादमुळे (Love jihad) एकट्या मीनाचिल (Meenachil) तालुक्यातील ४०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी केवळ ४१ मुलींना परत आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : Hinganghat कशासाठी प्रसिद्ध आहे?

भाजपा नेते पीसी जॉर्ज (P C George) म्हणाले की, केरळमधील सद्यपरिस्थिती पाहता ख्रिश्चन पालकांनी त्यांच्या त्यांच्या मुलींचे वय २४ वर्ष होण्याआधीच लग्न लावून टाकावे, असेही जॉर्ज (P C George) म्हणाले. मुळात केंद्र सरकारने यापूर्वी २०२० साली यावर भाष्य केले होते. लव्ह जिहादला (Love jihad) विद्यमान कायद्याअंतर्गत पारिभाषित केलेले नाही. तसेच केंद्रीय यंत्रणांनी अशाप्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही, असे सांगितले होते. सरकारने संसदेत माहिती देताना सांगितले की, संविधानाच्या (Constitution) कलम २५ नुसार, प्रार्थना करण्याचे, धर्माचे आचरण करण्याचे, धर्म स्वीकारण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आले आहे. (Love jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.