कोल्हापुरातील लव्ह जिहाद प्रकरण : मुस्लिम युवकाने हिंदू मुलीला कर्नाटकात नेले

151
कोल्हापुरातील इयत्ता ९वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी १७ नोव्हेंबर रोजी परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन झाल्यावर ती घरीच परतली नाही. तेव्हापासून मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रारी केली, पण पोलीस दखल घेत नव्हते, त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने करून हंगामा केला, त्यानंतर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिला. त्यामुळे अखेरीस पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी अवघ्या काही तासांतच लव्ह जिहाद प्रकरणाचा छडा लावला.

शुक्रवारी मुलीला आणणार 

बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडली आहेत. दोघांनाही कर्नाटक पोलिसांनी संकेश्वरमधून ताब्यात घेतले असून कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले. सकाळी झालेल्या आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन केले होत. यानंतर आता हे दोघे ही मिळाले असून गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा पहाटेपर्यंत दोघांना कोल्हापुरात आणणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकरण? 

कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात होती कोल्हापुरातील नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली होती. तर याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.मुलीसोबत मुस्लिम युवकही गायब झाल्यामुळे हा लव जिहाद असल्याचा संशय मुलीच्या पालकांना आणि काही हिंदुत्ववादी संघटना ना आला होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता मात्र सातारा दिवस उलटून ही अद्याप मुलगी मिळत नसल्याने पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. यामुळे आज कोल्हापुरात आमदार नितेश राणे आणि भाजपसह हिंदुत्ववादी संघटना कडून पोलीस स्टेशनच्या दारात मोठ आंदोलन ही झाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.