मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कटनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कटनीमधील एका हिंदू तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिचे लैगिक शोषण करण्यात आले. तसेच दोन वेळा तरुणीचा गर्भपात आणि गोमांस खाण्यास, नमाज अदा करण्यात करण्यास जबरदस्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपी साबिर अन्सारीला अटक केली आहे. (Love Jihad)
( हेही वाचा : Hindu : हिंदू मतदारराजा जागा राहा, हे धर्मयुद्ध संपणारं नाही..!)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथ नगर पोलिस ठाणे क्षेत्रातील रहिवाशी असणाऱ्या पीडित महिलांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी तिची आणि साबिर अन्सारी (Sabir Ansari) यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरु झाले. मात्र साबिरने पुढे पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्न करण्याचे आश्वसन देऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केले. परंतु लग्नाबद्दल विचारताच साबिर पीडितेला गप्प राहण्यास सांगत असे. यावेळी पीडिता गर्भवती राहिली, पण साबिरने तिचा गर्भपात केले. त्याने नमाज अदा करण्यास,गोमांस खाण्यासही पीडितेला जबरदस्ती केली. (Love Jihad)
दरम्यान पीडितेला कळले की, साबिरचा दुसरीकडे निकाह होत आहे. त्यावेळी पीडिता साबिरच्या घर गेली. मात्र साबिरने पीडितेला तोंड उघडल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात पीडितेने साबिर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार तपास सुरु केला आहे. (Love Jihad)
महिला पोलिस प्रभारी रश्मी सोनकर (Rashmi Sonkar) यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७, ६४(१), ६४(२)m आणि ३५१(२) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दि. २८ नोव्हेंबर रंगनाथ क्षेत्रातील बवाली टोला इथे पोलिसांनी साबिर अन्सारीला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. (Love Jihad)
हेही पाहा :