मध्य प्रदेशातील जबलपुरमध्ये लव्ह जिहादची (Love Jihad) एक घटना उघडकीस आली आहे. इथे एका मुस्लिम युवकाने आपली ओळख लपवून हिंदू तरुणीवर बलात्कार केला आहे. मुस्लिम युवकाने तरुणीला एका मैट्रिमोनियल वेबसाईटवरून (Matrimonial website) प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने अनेक वेळा तरुणीवर लैगिक अत्याचार केला. तसेच पीडितेला लग्नासाठी नकार दिला. ज्यामुळे पीडित तरुणीने संबंधिताविरोधात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Love Jihad)
( हेही वाचा : kids movies : या आहेत टॉप १० किड्स मुव्ही! हे चित्रपट आपल्या मुलांसोबत नक्कीच पाहा)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जबलपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद हुसैन (Mohammad Hussain) असून त्याने आपली ओळख राहुल असल्याचे पीडितेला सांगितले. याप्रकरणी पीडितेने सांगितले की, सुमारे दीड वर्षांपूर्वी एका मैट्रिमोनियल वेबसाईट (Matrimonial website) तिला राहुल नामक युवकाची प्रोफाईल दिसली. त्यानंतर पीडितेने आरोपीसोबत बोलण्यास सुरुवात केली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. (Love Jihad)
एक दिवस राहुल आणि पीडिता एका हॉटेलमध्ये भेटले. तिथे दोघांनी ही एकमेकांना आवड असल्याचे सांगून लग्न करण्याचा विचार दर्शवला. पीडितेने सांगितले की, राहुल नावावर विश्वास ठेवला. राहुलने दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी भेटीसाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलवले होते. तिथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. मात्र आरोपी काही दिवसांनी लग्नास नाही म्हणाला. तसेच पीडितेवर दबाव टाकून तिला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. (Love Jihad)
दरम्यान पीडितेला माहिती पडले की, राहुल नाव सांगणाऱ्या तरुणाची खरी ओळख मोहम्मद हुसैन (Mohammad Hussain) असे आहे. त्यानंतर पीडिता पोलिस ठाण्यात पोहचली. तिने लॉर्डगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मोहम्मद हुसैनला (Mohammad Hussain) अटक करण्यात आली आहे. आरोपीवर SC\ST आणि बाकी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मैट्रिमोनियल वेबसाईटला (Matrimonial website) ही नोटिस पाठवली आहे. ज्यांनी मोहम्मद हुसैनचे नाव राहुल असे प्रोफाईलवर ठेवले होते.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community