लव्ह जिहाद संदर्भात मंगळवारी यूपी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात लव्ह जिहाद (Love Jihad) करणाऱ्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. लव्ह जिहाद अंतर्गत अनेक गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासंबंधी पतित पावन संघटना पुणे (Patit Pawan Sanghatna Pune) शहर यांच्या वतीने देशभरात निष्पाप नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौकातील (Balgandharva Chowk) झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहराचे पालक शिवाजी चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते. (Love Jihad)
(हेही वाचा – खातेधारकांचे पीएमसी बॅंकेत 8485 कोटी अडकून; Ravindra Waikar यांनी अर्थमंत्र्यांपुढे मांडली व्यथा)
शहराध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले, पुण्यासह संपूर्ण भारतामध्ये जिहाद्यांनी लव्ह जिहाद, गो रक्षकांचा बळी घेणे हा जो ऊच्छाद मांडला आहे, त्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, व त्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी पतित पावन संघटनेची आहे. या हल्ल्यांचा निषेध म्हणून यावेळी जिहाद्यांचे प्रतिकात्मक पोस्टर जाळण्यात आले. (Love Jihad)
हेही पाहा –