Love Jihad : लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध मोहम्मद खानने हिंदू तरुणीला तीन वेळा केले गर्भवती, नंतर झाला फरार

पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध डॉ. खान हा पीडित हिंदू तरुणीशी शरीरसंबंध ठेवत राहिला. पीडितेकडून विरोध होत असतानाही तो जबदरस्ती संबंध ठेवायचा. यातून पीडित हिंदू तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली.  

393

उरण येथे धर्माध मुसलमानाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता मीरा रोड येथे लव्ह जिहादचा (Love Jihad) प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी धर्मांध मुसलमान डॉक्टरने हिंदू तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध ठेवले, तीन वेळा गर्भवती केले, त्यानंतर आता फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा 

मागील दीड वर्षे धर्मांध आणि वासनांध मुसलमान डॉ. मोहम्मद आसिफ खान (३०) हा त्या हिंदू तरुणीसोबत शरीर संबंध ठेवत होता. त्याच्या विरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला गुजरातच्या वापीमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ३४ वर्षीय पीडित हिंदू तरुणी मीरा रोड येथील फॅमिली केअर खासगी रुग्णालयात नोकरीला होती. एका महिला डॉक्टरच्या माध्यमातून तिची ओळख डॉ. मोहम्मद आसिफ खानशी झाली. ओळख वाढवत आरोपी जानेवारी २०२३ पासून सतत पीडितेच्या घरी येत होता. १८ फेब्रुवारी २०२३ पासून त्याने प्रेमसंबंध (Love Jihad) निर्माण केले. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध डॉ. खान हा पीडित हिंदू तरुणीशी शरीरसंबंध ठेवत राहिला. पीडितेकडून विरोध होत असतानाही तो जबदरस्ती संबंध ठेवायचा. यातून पीडित हिंदू तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली.

(हेही वाचा Award Ceremony : ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव)

आरोपी डॉक्टरने ओळखीच्या डॉक्टरांकडून गर्भपाताच्या गोळ्या मिळवून त्या पीडितेला खाऊ घातल्या. हे सत्र असेच सुरू राहिले. एकदा तर त्याने त्याची आई रजिया खान सोबत पीडितेचे बोलणे करून दिले, रजिया यांनी आरोपीच्या वडिलांना लग्नासाठी तयार करू, असे आश्वासन पीडितेला दिले. इकडे हा डॉक्टर प्रेमाचे नाटक करत संबंध ठेवत राहिला. तिसऱ्यावेळी आरोपीने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानंतर तो ४ दिवसांनी गुजरातमधील वापीला निघून गेला. पीडितेने त्याला अनेकदा त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो कॉल घेण्याचे टाळून लग्नास नकार देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने मीरा रोड पोलीस ठाणे गाठले. न्यायालयाने या डॉक्टरला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Love Jihad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.