आता छत्तीसगडमध्ये LOVE JIHAD; शाहबादने कुसुमच्या शरीराची केली चाळण 

122

दिवसेंदिवस हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांची क्रूर हत्या करण्याच्या मुसलमानांच्या कौर्याची शृंखला सुरूच आहे. श्रद्धा वालकर, तुनिशा शर्मा नंतर छत्तीसगडमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इथे शाहबाद याने हिंदू युवती नील कुसुम हिची स्क्रू ड्राइव्हरने वार करून अक्षरशः शरीराची चाळण केली, त्यातच कुसुमचा मृत्यू झाला.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात पंप हाऊस कॉलनीत आहे धक्कादायक प्रकार घडला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तरुणीच्या मानेवर, छातीवर आणि शरीराच्या इतर भागात स्क्रू ड्रायव्हरसारख्या धारदार वस्तूने 26 वार करण्यात आले होते. तिचा प्रियकर शाहबाद खान याने तिची हत्या केली होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नील कुसुम या तरुणीला मारण्यासाठी शाहबाद खान गुजरातहून कोरबा येथे आला होता. तरुणीचे दुसरे कोणावर तरी प्रेम आहे या संशयावरून त्याने तिची हत्या केली.

(हेही वाचा हिंदूंची घरे जळणाऱ्या दंगलखोर मुसलमानांकडून होणार ११ लाख रुपयांची वसुली)

असा केला खून 

नील कुसुम हिने मदनपूर (करताळा) शाळेत 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. आरोपी शाहबाद हा जशपूरचा रहिवासी आहे. तसेच तो कंडक्टर आहे. तरुणी ज्या बसमधून दररोज प्रवास करत असे, त्या बसचा तो कंडक्टर होता. दोघांमध्ये संवाद वाढू लागला आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नील कुसुम घरीच राहून पुढील शिक्षणाची तयारी करत होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, यावर्षी तिला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु काही कारणास्तव त्याला यंदा प्रवेश मिळू शकला नाही, म्हणून 2023 मध्ये प्रवेश घेण्याची तयारी होती. दरम्यान, नील कुसुमने तिचा प्रियकर शाहबादसोबतचा बोलणेही हळूहळू कमी केले. सध्या शाहबाद गुजरातमधील एका कंपनीत काम करत होता. तेथून तो जेव्हा-जेव्हा मुलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा तिचा मोबाईल अनेकदा व्यस्त असायचा. त्यामुळे तिचे आणखी कुण्या तरुणाशीही अफेअर असल्याचा शाहबादला संशय होता. त्याला पाथळगाव येथील आशिष केरकेट्टा याचे कुसुमशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याबाबत त्याने कुसुमला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आशिष हा कुसुमचा दूरचा नातेवाईक होता आणि तो तिच्या घरी वारंवार येत असे. कुसुमने विश्वासघात केला असे शाहबाद वाटले आणि त्याने तिला जावे मारण्याची योजना आखली.  24 डिसेंबर रोजी कुसुमने त्याला तिच्या घरी बोलावले. याठिकाणी शाहबादने प्रेमाचे वचन देऊन तिच्याशी आधी शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर सोबत आणलेल्या स्क्रू ड्रायव्हरने तिच्या अंगावर 26 हून अधिक ठिकाणी हल्ला केला. कुसुम आरडाओरडा करू नये म्हणून त्याने उशीने तिचे तोंड दाबले होते. तसेच घटनेनंतर आरोपी तरुणाने मोबाईल बंद करून तेथून पळ काढला.

(हेही वाचा जामिनावर बाहेर पडलेल्या देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची कार्यकारिणी आर्थर रोड बाहेर हजर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.