नांदेडमध्ये लव्ह जिहाद! घरातील ७२ लाखांचे दागिने चोरून मुलीने मुसलमानाबरोबर केला पोबारा!

नांदेड येथील हणेगाव येथील एका मोठ्या कापड व्यावसायिकाची ही मुलगी आहे. तर मुसलमान मुलाचे वडील या व्यापाऱ्याची जमीन कसतात. मुलगी १२ वी पास आहे, तर मुलगा १० वी नापास आहे.

91

केरळ, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांत जसे लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत, तशी प्रकरणे आता महाराष्ट्रात घडू लागली आहेत. नांदेड येथील हिंदू धर्मातील १९ वर्षीय मुलीने धर्मांध मुसलमान इशाद मोइनोद्दीन अत्तार या मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून घरातून पळून जाऊन त्याच्याशी निकाह अर्थात विवाह केला आहे. पळून जाण्यापूर्वी त्या मुलीने घरातील ७२ लाख सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपयांची रोखड सोबत चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.

मुलगी श्रीमंत घरातील, मुसलमान मुलगा गरीब! 

नांदेड येथील हणेगाव येथील एका मोठ्या कापड व्यावसायिकाची ही मुलगी आहे. तर मुसलमान मुलाचे वडील या व्यापाऱ्याची जमीन कसतात. मुलगी १२ वी पास आहे, तर मुलगा १० वी नापास आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला मुलीचा वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर मुलीच्या वडिलांनी न्यायालयात जाऊन दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर मरखेल पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा : विद्यार्थ्यांची फरफट, शिक्षकांना लागली घरघर! राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा!)

मुलीच्या वडिलांचे नेमके आरोप काय?

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार मोइनोद्दीन अत्तार याच्या मुलाने त्यांच्या मुलीशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलीच्या प्रियकराने त्यांच्या मुलीला घरातील परंपरागत ७४ तोळ्याचे दागदागिने, सोने, २५ लाख रुपये रोख रक्कम घेऊन सोबत घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीने हा सर्व ऐवज मुलाच्या सांगण्यावरून घरातून चोरून नेला आणि दोघांनी आता पोबारा केला आहे, असे मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

मुलाने मुलीचे धर्मांतर केले, व्यावसायिकाच्या कुटुंबियांचा दावा

या प्रकरणात धर्मांध मुसलमान मुलाने त्या मुलीचे हैदराबाद येथे धर्मांतर केले, असा आरोपही मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पण त्याचवेळी नांदेड पोलिसांनी छापा मारून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे हणेगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुलगी म्हणते, स्वतःच्या मर्जीने धर्म बदलला!

दरम्यान या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यात तिने सर्व आरोप फेटाळले आहेत. मी माझ्याच गावाचा तरुण इशाद मोइनोद्दीन अत्तार याच्यावर प्रेम करते. ही गोष्ट माझ्या कुटुंबियांना गेल्या पाच वर्षांपासून माहित आहे. पण ते जेव्हा आमच्या लग्नाला नकार देत होते तेव्हा आम्ही दोघांनी मिळून हैदराबादला येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी 1 मार्चला इथे आली. मी त्याचदिवशी माझ्या मर्जीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी निकाह केला, असे तरुणी व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

(हेही वाचा : मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा हा आहे ‘मूलमंत्र’! महाराष्ट्रात कसा होणार भाजपला फायदा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.