उत्तर प्रदेशात Love Jihad; हिंदू तरुणीशी जबरदस्तीने ‘निकाह’ करून मुंबईत केले धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार

ही घटना उत्तर प्रदेशामधील बांदा जिल्ह्यातील गिरवान पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे २० मे रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

480

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून लव्ह जिहादचे (Love Jihad) एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका हिंदू मुलीशी विवाह करून तिला मुंबईत नेऊन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्याआधी त्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्याविषयी भाष्य केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची सुटका करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही घटना बांदा जिल्ह्यातील गिरवान पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे २० मे रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महुआ गावातील शकील याने आपल्या मुलीला आधी दारू पाजून बेशुद्ध केले आणि नंतर तिचे अपहरण करून अज्ञातस्थळी नेले, असे तक्रारीत म्हटले आहे. शकीलसोबत त्याचे काही साथीदारही या अपहरणात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३६६ अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. मुलीला मुंबईतून ताब्यात घेतले, तसेच शकीलला अटक करण्यात आली.

(हेही वाचा राज्यात महायुतीला ३०, महाविकास आघाडीला १८ जागा, दोन केंद्रीय मंत्री पराभूत; ‘हिंदुस्थान पोस्ट’चा Exit Poll)

सोशल मीडियावर केली बदनामी 

पीडितेला बांदा येथे आणून चौकशी करण्यात आली. मुलीने सांगितले की, 20 मे रोजी शकीलने तिला पहिल्यांदा काहीतरी देऊन बेशुद्ध केले. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा पीडिता ट्रेनमध्ये होती. तिच्यासोबत शकीलही होता. त्यावेळी शकीलने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तो तिला मुंबईला घेऊन गेला. येथे मुलीला मशिदीत नेण्यात आले. पीडितेला मशिदीत इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती करण्यात आली. या ठिकाणी मुलीचे नाव इकरा असे होते. यानंतर शकीलने पीडितेशी जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. पीडित मुलीशी लग्न केल्यानंतर शकीलने तिचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. विश्व हिंदू परिषदेने या घटनेला लव्ह जिहाद (Love Jihad) म्हणत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पीडितेची सुटका झाल्यानंतर या प्रकरणात उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायदा आणि बलात्काराच्या कलम 376 मध्ये वाढ करण्यात आली आहे. शकीलची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेतील अन्य आरोपींचा सहभाग तपासण्यात येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.