उत्तर प्रदेशातील नोएडा येथे लव्ह जिहादचे (Love jihad) एक प्रकरण उघडकीस आले आहे. तिथे ताबिश असगर (Tabish Asghar) नावाच्या मुस्लिम तरुणाने हिंदू असल्याचे सांगत हिंदू तरुणीसोबत निकाह केला. त्यानंतर तरुणीवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी असगर जबरदस्ती करू लागला. हिंदू (Hindu) तरुणीला फसवण्याच्या संपूर्ण प्रकरणात असगरच्या कुटुंबियांनीही त्याची साथ दिली. हिंदू (Hindu) तरुणीला डोंगरावरून ढकलून हत्या करण्याचा ही प्रयत्न असगरने केला. याप्रकरणी पीडित तरुणी पोलिस ठाण्यात गेली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुस्लिम तरुणाला अटक केली आहे. (Love jihad)
( हेही वाचा : Devendra Fadnavis : देवाभाऊंचे त्रिवार अभिनंदन! पण, सावधान… खरा धोका पुढे आहे!)
ऑपइंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण नोएडाच्या पोलिस ठाण्याच्या ११३ सेक्टरमधील आहे. या पोलिस ठाण्यात एका हिंदू तरुणीने दि. ३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. पीडिताने सांगितले की, ४ वर्षांपूर्वी तिची ओळख फेसबुकवर एका तरुणाशी झाली. फेसबुक प्रोफाइलवर त्याचे नाव विशाल (Tabish Asghar) असे होते. त्यानंतर दोघांचीही ओळख झाली. भेटीमध्ये त्याने आपले नाव विशाल राणा असल्याचे सांगितले. त्याने आपण हिंदू राजपूत असल्याचे सांगून पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. (Love jihad)
दि. २० डिसेंबर २०२१ रोजी पीडिता आणि विशाल राणा यांची साखरपुडा झाला. या कार्यक्रमात विशालचा (Tabish Asghar) भाऊही उपस्थित होता. त्याने आपले नाव वासू राणा असल्याचे सांगितले. दि. २२ फेब्रुवारी २०२३ ला गाजियाबादमधील हिंदू तरुणीची आणि विशाल राणा (Tabish Asghar) यांचा विधीवत विवाह झाला. या लग्नात पीडितेचे कुटुंबीय ही उपस्थित होते. लग्नानंतर विशाल आणि हिंदू तरुणी एकत्र राहत होते.(Love jihad)
लग्नाच्या काही दिवसांनंतर विशाल राणा याने हिंदू तरुणीला कोर्ट मॅरेज करण्यास सांगितले. त्यासाठी तो तरुणीला अलाहबाद हायकोर्टात (Allahabad High Court) घेऊन गेला. हिंदू तरुणीने मॅरेज प्रमाणपत्र पाहिल्यावर तिला लक्षात आले की, ज्याच्याशी लग्न केलेले आहे तो विशाल नसून ताबिश असगर आहे. तसेच साखरपुड्यात भाऊ म्हणून उपस्थित राहिलेला वासू राणा हा वसीम आहे. त्यानंतर पीडितेने विरोध दर्शवल्यावर तिला इस्लाम कबूल करण्यास, गर्भपात करण्यास भाग पाडले.
दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २० दिवसांत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी ताबिशवर ३२३,३१३,५०६ आणि धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची अटकेनंतर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. (Love jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community