Love Jihad : अमित नाव सांगून पोलिस हवालदार बादशाहने पीडितेकडून उकळले ५५ लाख रुपये

120
Love Jihad : अमित नाव सांगून पोलिस हवालदार बादशाहने पीडितेकडून उकळले ५५ लाख रुपये

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बादशाह खान नावाच्या पोलिस हवालदारावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस हवालदाराची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. पोलिस हवालदार बादशाह याने आपले नाव अमित असल्याचे सांगत हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. पीडित तरुणीही पारिचारिकेचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. त्यात आरोपी बादशाहवर खरी ओळख लपवून शारीरीक संबंध ठेवल्याचा ही आरोप आहे. तसेच बादशाहने पीडितेला इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचे लखनऊ येथील चिन्हाट पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. (Love Jihad)

(हेही वाचा – महाराष्ट्र बांगलादेशी अन् रोहिंग्यामुक्त करायचा आहे; Nitesh Rane)

ही घटना लखनऊ येथील चिन्हाट पोलीस ठाणे परिसरात घडली. पीडित युवती ही मूळची शाहजहानपूरची असून, ती एका महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेते. दि. ३० डिसेंबर रोजी पीडितेने शाहजहापूर जिल्ह्यात पोलिस हवालदार म्हणून काम करणाऱ्या बादशाहाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले की, ती २०१४ मध्ये बादशाह खानला भेटली होती. तेव्हा बादशाहने अमित असे नाव सांगत तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. तसेच पीडितेने तक्रारीत सांगितले की, बादशाह खान तिला तिला अनेक ठिकाणी घेऊन गेला. २०१५ मध्ये बादशाह खानची यूपी पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी नियुक्ती झाली होती. पोलीस पदावर सक्रिय झाल्यानंतर बादशाह खानने एका मुस्लिम युवतीसोबत विवाह केला. याप्रकरणाची माहिती पीडितेला मिळाली. यानंतर बादशाहने पत्नीला सोडचिठ्ठी दिली असल्याचे सांगितले. आरोपीने पीडितेसोबत ६ वर्षांपासून शारीरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला. तसेच बादशाह पीडितेला ब्लॅकमेल करत असून फोन ट्रेस करत असल्याचे ही पीडितेने तक्रारीत सांगितले. (Love Jihad)

(हेही वाचा – Air Marshal Jitendra Mishra बनवे पश्चिम हवाई मुख्यालयाचे प्रमुख)

दरम्यान बादशाहने पीडितेकडून ५० हजार रूपये घेतले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार पीडितेच्या लक्षात आला. कारण ऑनलाईन पैसे देत असताना पीडितेला पेमेंट अॅपवर बादशाह खान असे नाव दिसले. यावेळी तिने बादशाह खानला यासंबंधित प्रश्न केला असता तिला बादशाहने इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला. यावेळी बादशाहच्या पत्नीने मुस्लिम समाजात ४ बायका ठेवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे आता तु मुस्लिम झाल्यास बादशाह तुझ्याशी निकाह करेल असे बादशाहची पत्नी म्हणाली. पीडितेने असा दावा केला आहे की, आतापर्यंत आरोपीने तिच्याकडून ५५ लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पीडितेने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्याचसोबत पोलीस पुढील तपास करत आहेत. पुराव्यानिशी आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. (Love Jihad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.