उल्हासनगर येथे राहणारी दृष्टी चौधरी ही अत्यंत हुशार मुलगी, पण धर्मांध मुसलमानांच्या विळख्यात अडकली. त्यानंतर दृष्टीला मलेशियात नेण्यात आले, तिथे तिला अमली पदार्थांचे सेवन करण्यास दिले, धर्मांतराविषयी झाकीर नाईकची भाषणे ऐकवण्यात आली. नंतर ब्लॅकमेल करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले. अशा प्रकारे २०२२ साली दृष्टी चौधरी हिचे नाव आयेशा सिद्दीकी करण्यात आले. या प्रकरणी दृष्टीच्या आईने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र आता ते तिघेही जामिनावर बाहेर आहेत. अशा प्रकारे दृष्टी लव्ह जिहाद (Love Jihad) मध्ये अडकली.
मुंबई हल्ल्यासंबंधीच्या नोट्स सापडल्या
दृष्टीला फूस लावून तिचे धर्मांतर केल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. आईने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आयेशाचे साथीदार सलीम चौधरी, काझी इलियास निझामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सध्या हे दोघे जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. सध्या फरार असलेला मलेशियात आश्रय घेतलेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी दृष्टीकडे सापडल्या आहेत. तसेच मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात काही नोट्सही दृष्टीकडे सापडल्या असल्याने तपास यंत्रणा अवाक झाल्या आहेत. लव्ह जिहाद (Love Jihad) च्या माध्यमातून अडकवलेल्या दृष्टीला धर्मांध बनवले.
बनावट पालक उभे करून केले धर्मांतर
२०२२ मध्ये दृष्टी चौधरीने मुस्लिम धर्मानुसार रोजा ठेवल्याने तिच्या कुटुंबीयांना संशय आला. आई लंडनला गेली असता दृष्टीचे बनावट कागदपत्रांच्या आधारे धर्मांतर करण्यात आले. धर्मांतराच्या वेळी दुसऱ्यांनाच पालक म्हणून उभे करण्यात आले होते, असा दृष्टीवर आरोप ठेवण्यात आला. धर्मांतरानंतर दृष्टीने नावात बदल करून आयेशा सिद्दीकी असे नाव ठेवले. धर्मांतरानंतर दृष्टीने आई-वडील यांच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्यात आली. दृष्टीच्या साथीदारांनी तिच्या आईला गरम चाकूचे चटके दिल्याचा आरोप करण्यात आला. तिला समजावणाऱ्या पोलिसांना हिंदू दहशतवादाची उपमा देण्यात आली.
(हेही वाचा Bangladesh Violence : बांगलादेशात आता दहशतवादी संघटनांना मिळाले मोकळे रान; कोणत्या संघटना झाल्यात सक्रिय?)
प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची मागणी
या प्रकरणात सृष्टीला मलेशियात नेण्यात आले होते, तिथे झाकीर नाईकची भाषणे तिने ऐकलेली आहेत. त्यामुळे कल्याण पोलीस तर मलेशियात जाऊन तपास करू शकत नाहीत, त्यामुळे आधी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात यावे, त्यानंतर त्यात इंटरपोलची भूमिका येईल. जर अशा प्रकारे मुलींना परदेशात स्मगलिंग करून त्यांचे धर्मांतर करून त्यांचा वापर केला जात असेल तर भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. म्हणून हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची मागणी आमची आहे, असे लीगल राइट्स ऑब्झरवेटरी संस्थेचे विनय जोशी म्हणाले.
दृष्टी मोठ्या रॅकेटमध्ये अडकली
मुलीचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले आहेत. किती दिवस झाले मुलीला बघितले नाही. त्या दिवशी बघितले, पण लांबून काचेमधून पाहिले. माझी मुलगी खूप हुशार आहे. तिच्या नावावरून आणि तिच्या आधारकार्डवरील आमच्याकडील पत्त्यावरून ते लोक कर्ज काढत आहेत आणि बँकवाले आमच्याकडे वसुली करायला येत आहेत. त्यांनी मुलीला खूप मोठ्या रॅकेटमध्ये अडकवले आहे. त्यामुळे मुलगी घाबरून आमच्याशी काही बोलत नाही. मुलीने इस्लाम कबूल केला, आता तुम्हीही करा म्हणून आम्हाला घरात घुसून मारले. ते मुलीला सांगत होते की, तुला एक गोळी खाऊ घातली ना, तर तुला अल्लाच्या शिवाय दुसरे कुणी दिसणार नाही. त्यामुळे निश्चितच आमच्या मुलीला अमली पदार्थ दिले जात असावेत. तिच्याशी असा काही प्रकार केला असावा त्याआधारे तिला ब्लॅकमेल केले जात आहेत. त्यामुळे आमची मुलगी त्यांच्या नियंत्रणात आहे, असे दृष्टीच्या आईने म्हटले.
Join Our WhatsApp Community