जानेवारीचे हे तीन दिवस हवेचा दर्जा ढासळला! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती

196

जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मुंबईत सूक्ष्म धूलिकणांची मात्रा वाढल्याची आकडेवारी केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या विभागाने ऑनलाईन प्रणालीतून प्रसिद्ध केली होती. या आकडेवारीवरुन झालेल्या गदारोळावरुन आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सफरची नोंद अशास्त्रीय असल्याचा दावा केला आहे. सफर ही ऑनलाईन प्रणाली राज्यातील मुंबई व पुणे या दोन शहरांतील हवेची गुणवत्ता दर्शवते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील विविध भागांत हवेच्या गुणवत्ता मोजणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या सर्व स्थानकांतील नोंदी शास्त्रीय असून, त्याआधारे आम्हांला दर हिवाळ्यात राज्यातील सूक्ष्म धूलिकणांमुळे ढासळणारी हवेची गुणवत्ता समजते. मुंबईप्रमाणेच राज्यातही विविध ठिकाणी सूक्ष्म धूलिकणांची मात्रा वाढली होती. मात्र कुठेही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी स्थिती आढळली नाही असेही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

( हेही वाचा : तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के! 4.8 रिश्टर स्केल तीव्रता )

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबईत १४ ठिकाणी विविध स्थानकांसह राज्यात ६९ स्थानकांची उभारणी केली आहे. या स्थानकांवर हवेची गुणवत्ता मोजली जाते. २६ ते २८ जानेवारी दरम्यान मुंबईत हवेचा दर्जा अतिखराब होता, अशी नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून झाली. याबाबतची माहिती आम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आम्ही दिल्याचे अधिकारी म्हणाले. तीन दिवसांच्या हवेच्या ढासळत्या दर्ज्याच्या नोंदी केवळ मुंबईत नव्हत्या तर राज्यातील इतर काही भागांतही दिसून आल्या. हवेचा दर्जा तीन दिवसानंतर पूर्ववत झाला. या तीन दिवसांमागील अतिखराब हवेच्या दर्जाबाबत उपाययोजना करू असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

जानेवारी महिन्याच्या अखेरिस काही दिवस वाऱ्यांचा वेग मंदावला होता. मुंबईत २० ते २५ किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहतात परंतु जानेवारीच्या अखेरिस वारे ५ ते १० किलोमीटर प्रतिवेगाने वाहत होते. किनारपट्टीवरुन राज्यभरात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेगात बदल होत नाही. २६ ते २८ जानेवारीदरम्यान मुंबईत केवळ वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, सायन, कुलाबा, सायन, विलेपार्ले आणि चेंबूर येथील स्थाकांवर हवेचा दर्जा अतिखराब होता.

३०० प्रति क्युबिक मीटरच्या पुढे गेलेली मुंबईतील स्थानके
स्थानके                                     तारीख
                                 २६ जानेवारी        २७ जानेवारी         २८ जानेवारी
वांद्रे                                 ३०१                ३०३                    ३०२
वांद्रे-कुर्ला संकुल                   २६०                ३००                    २४०
चेंबूर                                २७४                 ३०३                   १९५
कुलाबा                             ३०१                 २६४                     २२१
सायन                               २०३                  २४९                    ३००

३०० प्रति क्युबिक मीटरच्या पुढे गेलेली मुंबईबाहेरील स्थानके
स्थानके २६ जानेवारी २७ जानेवारी २८ जानेवारी
कोप्रीगाव- वाशी ३१० २६५ ३०९ – ३० जानेवारीला हवेचा दर्जा ३१० प्रतिक्युबीकपर्यं पोहोचला
सानपाडा ३१५ ३०८ २८७ – ३१ जानेवारीला हवेचा दर्जा ३०० प्रति क्युबिकपर्यंत पोहोचला

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.