महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण कमी! केंद्राची पुन्हा नाराजी 

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ५७ टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा ७०.३ टक्क्यांवर होता, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. राज्यात अपेक्षित संख्येने कोरोना चाचण्या होत नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली आहे. भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना लिहिलेल्या पत्रात तास उल्लेख केला आहे.

केवळ ५७ टक्के कोरोना चाचण्या!

राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अपयश आले, प्रशासकीय यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या, या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना भूषण यांनी महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्यांमध्येही कमतरता असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा ५७ हजारांवर पोहोचला असून, ही रुग्णसंख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या हळूहळू वाढत असली, तरी पुरेशी नाही, असेही भूषण यांनी नमूद केले. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ५७ टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा ७०.३ टक्क्यांवर होता, असे सांगितले जात आहे. आरटी-पीसीआर आणि कोरोना चाचण्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत, असे भूषण यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : धक्कादायक! घरी परतणाऱ्या परप्रांतीयांना दिले बोगस कोरोना निगेटिव्ह अहवाल! )

केंद्रीय पथकाकडूनही नाराजी!

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नमुना चाचणी, रुग्णांची शोधमोहीम आणि प्रतिबंधात्मक विभागांमधील व्यवस्था, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन व त्यांची अंमलबजावणीची स्थिती, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा, ऑक्सिजन सुविधा- वैद्यकीय सुविधा- अतिदक्षता विभाग तसेच अन्य विभागातील खाटांची उपलब्धता आणि लसीकरणाचा वेग अशा प्रमुख पाच बाबींचा आढावा घेण्याची सूचना केंद्रीय पथकांना करण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील ३० जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी ही पथके करत असून त्यांच्याकडून दररोज केंद्र व राज्य सरकारांना अहवाल दिला जात आहे. तसेच  या पथकाकडून गरजेनुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना आणि सल्ला दिला जात आहे. केंद्रीय पथकाने भेट दिलेल्या एकाही जिल्ह्यामध्ये करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here