या 19 जिल्ह्यांत ‘झिरो’ बूस्टर डोस

191

10 एप्रिलपासून 18 ते 59 वयोगटातील सर्वांसाठी कोविड लसीचा बूस्टर डोस सुरू करण्यात आला आहे. या लसीकरणाला शहरी भागांत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून, ग्रामीण भागात मात्र हा प्रतिसाद कमी कमी असल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये बूस्टर डोससाठी एकही नोंदणी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

शहरांत चांगला प्रतिसाद

खासगी आरोग्य केंद्रांवर 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी सशुल्क बूस्टर डोस देण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत राज्यात 6 हजार 478 नागरिकांनी या डोसचा लाभ घेतला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये सर्वाधिक लसीकरण झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत 3 हजार 163, पुण्यात 1 हजार 420, ठाण्यात 1 हजार 344 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत मात्र बूस्टर डोसला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे. राज्यातल्या तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये बूस्टर डोसचे शून्य लसीकरण झाल्याचे कळत आहे.

(हेही वाचाः IT क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; Capgemini मध्ये 60,000 नव्या पदांची भरती)

ग्रामीण भागांत अल्प प्रतिसाद

रायगड जिल्ह्यात 187, नागपूरात 143, पालघरमध्ये 97, कोल्हापूर 28 आणि जळगावात 14 जणांनी, तर सोलापूर आणि औरंगाबादमध्ये केवळ 7 जणांनी बूस्टर डोसची मात्रा घेतली आहे. तसेच अहमदनगर, अमरावती, रत्नागिरी, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांत पाचपेक्षाही कमी जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. प्रत्येक गावात लसीकरण पोहोचवण्यासाठी लसीकरणाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण सर्वाधिक खासगी रुग्णालये शहरांमध्येच केंद्रित असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बूस्टर डोसचे लसीकरण होऊ शकत नसल्याचे बोलले जात आहे.

या जिल्ह्यांत शून्य लसीकरण

अकोला, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग.

(हेही वाचाः २ वर्षांनी दुमदुमणार विठुनामाचा जयघोष! असा असणार आषाढी पायी वारीचा सोहळा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.