गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेला लोअर परळ पूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 18 सप्टेंबरपासून या पुलाची एक मार्गिका चालू होणार आहे. लोअर परळहून प्रभादेवीकडे जाणारा हा पूल 3 जून रोजी सुरू करण्यात आला होता, तर लोअर परळहून करीरोडकडे जाणारी मार्गिका उद्यापासून (सोमवार) सुरू होणार आहे.
प्रभादेवी, वरळी, करीरोड आणि लोअर परळच्या रहिवाशांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी हा पूल खूप महत्त्वाच आहे. हा पूल गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. या पुलावरून वाहतुकीला सुरुवात झाल्यामुळे डिलाई रोड, वरळी, लोअर परळ, दादर येथे राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : पत्रकारांवर बहिष्कार ही विरोधकांची राजेशाही प्रवृत्ती; बावनकुळे यांची विरोधकांवर टीका )
२०१८ साली आयआयटी मुंबईने हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केले. त्यानंतर तो तात्काळ पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दोन वर्ष कोरोना काळात हा पूल रखडून राहिला. रेल्वेच्या काही परवानग्यांमुळे त्यामध्ये आणखी वर्ष निघून गेली. आता मुंबई महानगरपालिकेनं या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, यासाठी प्रयत्न केलं आणि आता सोमवारपासून या पुलावरील एक मार्गिका सुरू होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community