Weather Update : मुंबईत थंडी वाढली ; हंगामातील सर्वात निचांक तापमानाची नोंद

मुंबईत या मोसमातील १७.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानची नोंद झाली असून मुंबईत शनिवारी हा या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे.

291
Weather Update : मुंबईत थंडी वाढली ; हंगामातील सर्वात निचांक तापमानाची नोंद

उत्तर भारतासोबतच मुंबईतही थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि परिसरात शनिवारी (६जानेवारी) पसरलेल्या धुक्यामुळे मुंबईकरांना थंडीचा चांगलाच अनुभव घेता आला आहे. मुंबईत शनिवारी हा या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. शनिवारी शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. शनिवारी उपनगरातील किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. तर हवामान तज्ञांच्या मते उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. (Weather Update)

सध्या उत्तर भारतासोबतच मुंबईतही थंडीला सुरुवात झाली आहे . मुंबई आणि परिसरात शनिवारी सकाळी पसरलेल्या मुंबईकरांना थंडीचा चांगलाच अनुभव घेता आला आहे. मुंबईत शनिवारी हा या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. तर अरबी समुद्राकडून पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबई आणि परिसरात ढगाळ हवामान राहील.तर ७ ते ९ जानेवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.(Weather Update)

(हेही वाचा : Bangladesh Election 2024 : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक; बीएनपीचा निवडणुकीवर बहिष्कार)

मुंबईमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडी अनुभवता येत असल्याने आता कुठे हिवाळा सुरु झाला आहे. शनिवारी उत्तर कोकण वगळता किनारपट्टीवर इतर कुठेही किमान तापमानात घट झालेली नाही. सांताक्रूझ येथे १७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर कुलाबा येथे २० अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे .

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.