आज रविवार १ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाचं बजेट कोलमडणार आहे. कारण, आजपासून (LPG Commercial Gas Cylinders) व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
सविस्तर माहितीनुसार, आजपासून एलपीजीच्या सिलिंडरच्या (LPG Commercial Gas Cylinders) किंमती वाढल्या आहेत. तेल वितरण कंपन्यांनी दर वाढवल्याने या किंमती वाढल्या आहेत. त्यामुले आता १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर (Commercial Cylinders) मागे आता अधिकचे २०९ रुपये मोजावे (Price Hike) लागणार आहेत.
(हेही वाचा – Kokan Railway : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत)
काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या व्यावसायिक सिलिंडरच्या (LPG Commercial Gas Cylinders) दरात घसरण झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये तब्बल १५७ रुपयांनी घट करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला होता. मात्र आता लगेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात वाढ झाली आहे.
त्यामुळे आता या नवीन दरवाढीनुसार दिल्लीमध्ये १९ किलो व्यावसायिक सिलिंडरसाठी (LPG Commercial Gas Cylinders) आता १,७३१.५० रुपये मोजावे लागणार आहेत तर, मुंबईमध्ये १९ किलो व्यावसायिक सिलिंडरची १६८४ रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community