नवीन वर्षात व्यावसायिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. इंडियन ऑईलने कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागच्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
व्यावसायिकांना मोठा दिलासा
नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर करण्यात आली आहे. आयओसीएलच्या मते, 1 जानेवारी 2022 पासून मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्तने कमी होऊन 1948.50 पर्यंत खाली आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना 19 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 2051 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी 2131 रुपये, दिल्लीत 1998.5 रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता आजपासून 2076 रुपयांना खरेदी करता येणार आहेत.
( हेही वाचा: 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी अशी करा नोंदणी)
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल नाही
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे.
Join Our WhatsApp Community