LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात; ‘अशा’ असतील नव्या किंमती

145

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सरकारने कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे. सरकारने कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे. 1 नोव्हेंबरपासून 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात 115.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु घरगुती सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरता कोणतेही बदल झालेले नाहीत.

दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर 1744 रुपये झाले आहेत. यापूर्वी 19 किलोच्या कमर्शिअल सिलिंडरसाठी 1859.50 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत कमर्शिअल एलपीजी सिलिंडर यापूर्वी 2009.50 रुपयांना मिळत होता. दर कपातीनंतर याची किंमत आता 1893 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडर आता 1995.50 रुपयांना मिळणार आहे.

( हेही वाचा: १ नोव्हेंबरपासून ‘हे’ बदल तुमच्या आयुष्यावर करणार परिणाम! )

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात नाही 

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. कोलकात्यात घरगुती सिलिंडरची किंमत 1079 रुपये, चेन्नईत 1068.50 रुपये आणि मुंबईत 1052 रुपयांना मिळतो. देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 14 किलोच्या घरगुती आणि 19 किलोंच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करत असतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.