वर्षाच्या अखेरीस LPG Cylinder पुन्हा महागला!

90
वर्षाच्या अखेरीस LPG Cylinder पुन्हा महागला!
वर्षाच्या अखेरीस LPG Cylinder पुन्हा महागला!

डिसेंबर महिना सुरू झाला आहे. लवकरच २०२४ हे वर्षही संपेल. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती पहिल्या तारखेला अपडेट करण्यात आल्या आहेत. नवीन अपडेटनुसार व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial cylinder) किमती वाढल्या आहेत. मात्र, देशांतर्गत सिलिंडरचे दर अजूनही स्थिर आहेत. या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. (LPG Cylinder)

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल नाही
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. तर 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या आघाडीवर सरकारने भाव स्थिर ठेवले आहेत. तर काही महिन्यांपूर्वी त्यावर सबसिडी (Subsidy) जाहीर केली होती. त्यामुळे 1100 रुपयांच्या घरात मिळणारा सिलेंडर आता 800 ते 900 रुपयांदरम्यान मिळत आहे. (LPG Cylinder)

व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली. सलग पाचव्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमती 16.50 रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर देशातील चार प्रमुख शहरातील व्यावसायिकांना आता गॅस सिलेंडरसाठी जादा किंमत मोजावी लागेल. त्यानुसार, दिल्लीत गॅस सिलेंडर आता 1818.50 रुपयांना मिळेल. तर मुंबईत 1771 रुपये, कोलकत्तामध्ये 1927 रुपये आणि चेन्नईत 1980 रुपयांना गॅस सिलेंडर मिळेल. या दरवाढीमुळे हॉटेलिंग महाग होणार आहे. खाद्यपदार्थांसाठी जादा किंमत मोजावी लागू शकते. (LPG Cylinder)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.