LPG सिलिंडरचे दर महागले; गॅसची बचत करण्यासाठी या आहेत सोप्या टिप्स

155

सध्या LPG गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. भारत सरकारच्या विविध योजनांमुळे आता घरोघरी गॅस सिलिंडर वापरला जातो. परंतु एलपीजी सिलिंडच्या वारंवार वाढत असलेल्या किंमतींमुळे महिन्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅस हा स्वयंपाकासाठी अनिवार्यच आहे. त्यामुळे या वाढच्या महागाईच्या काळात आपला घरगुती सिलिंडर कसा जपून वापरावा, गॅस वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी काही टिप्स जाणून घ्या…

( हेही वाचा : LPG गॅस सिलिंडरचा शोध केव्हा लागला?)

एलपीजी गॅसची बचत करण्याच्या टिप्स 

  • झाकण न ठेवता पदार्थ शिजवल्यास अधिक गॅस वापरला जातो. त्यामुळे अन्न शिजवताना ते झाकून शिजवणे आवश्यक आहे.

New Project 1 25

  • भात, कडधान्य, डाळ एकदाच कुकरमध्ये शिजवून घ्या. यामुळे गॅस बचत करण्यास मदत होईल.
  • पाणी गरम करण्यासाठी सोलार, पाणी गरम करणाऱ्या इलेक्ट्रिक यंत्रणांचा वापर करा. अनेक सोसायट्यांमध्ये सौरऊर्जेवर पाणी तापवण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
  • दूध, फ्रोजन फूड गरम करण्यापूर्वी १ ते २ तास फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. हे पदार्थ जास्त गार असतात त्यामुळे गरम होण्यासाठी वेळ लागतो म्हणूनच हे पदार्थ १ ते २ तास आधीच बाहेर काढून सामान्य तापमानावर आल्यावर गरम करा.
  • गॅसवर अन्न मध्यम आचेवर शिजवा.

New Project 2 22

  • गॅस बारीक केला म्हणजे आपण गॅसची बचत करतो असा आपला गैरसमज आहे. त्यामुळे आधी पदार्थ मोठ्या गॅसवर शिजवून त्यानंतर गॅस फ्लेम बारीक करावी.
  • स्वयंपाक करताना योग्य प्रकारचे भांडे वापरा. दोन ते तीन जणांचा स्वयंपाक करण्यासाठी मोठी कढई, टोप वापरणे टाळा मोठी भांडी तापण्यासाठी बराच गॅस वाया जाण्याची शक्यता असते.
  • अनेकदा गृहिणी स्वयंपाक करताना खूप वेळ आधीच कढई तापत ठेवतात परंतु असे करण्यापेक्षा पदार्थ करण्याची सर्व तयारी करून त्यानंतर गॅस पेटवावा यामुळे वेळ वाचेल आणि गॅसची बचतही होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.