LPG Gas Connection : १६ जून पासून घरगुती गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागणार एवढे रुपये

तुम्ही नवीन घरगुती गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत.

घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढल्या

यापूर्वी गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठी ग्राहकांना १४५० रुपये मोजावे लागत होते परंतु आता तुम्हाला यासाठी ७५० रुपये अधिक म्हणजेच एकूण २ हजार २०० रुपये मोजावे लागणार आहेत. हा नवा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति ७५० रुपयांनी वाढ केली आहे. तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर नव्या नियमांनुसार तुम्हाला ४ हजार ४०० सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. याआधी ग्राहकांना केवळ २ हजार २०० रुपये भरावे लागत होते. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

( हेही वाचा : वीजग्राहकांचा गो-ग्रीन Digital वीजबिलांना कमी प्रतिसाद!)

यासोबतच ग्राहकांना रेग्युलेटरसाठी १५० रुपयांऐवजी २५० रुपये खर्च करावे लागतील. केंद्र सरकारच्या उज्जवला योजनेच्या ग्राहकांना सुद्धा याचा फटका बसणार असून, उज्जवला योजनेच्या ग्राहकांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सिक्युरिटी जमा करावी लागणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन घेतल्यास त्याला पूर्वीप्रमाणेच सिलिंडरची सिक्युरिटी द्यावी लागेल.

  • विनाअनुदानित गॅस सिलिंडर – १०६५ रुपये
  • सिलिंडर सुरक्षा रक्कम – २ हजार २०० रुपये
  • रेग्युलेटरसाठी सुरक्षा – २५० रुपये
  • पासबुक – २५ रुपये
  • पाईप – १५० रुपये

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here