इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलेंडर आता 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे. मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर, आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता. दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर, सिलेंडर 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.
( हेही वाचा:बिहारच्या अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के )
अशा आहेत इतर शहरांतील किंमती
कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2132 रुपये होती. चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर, 2 हजार 141 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2 हजार 177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.