गॅस दरांचा नवा उच्चांक, मुंबईतले दर वाचून होईल संतापाचा ‘भडका’

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामांन्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. त्यात आता सामांन्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी बातमी समोर येत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

गॅसचे दर पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढवल्यामुळे आता घरगुती गॅससाठी सामांन्यांना तब्बल 1 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामांन्यांच्या संतापात आता आणखी भर पडणार आहे.

(हेही वाचाः या बँकेच्या 600 शाखा बंद होणार, तुमचे अकाऊंट इथे आहे का?)

दोन महिन्यांत 100 रुपयांची वाढ

मुंबईत एका विनाअनुदान घरगुती LPG गॅस सिलिंडरची किंमत आता 999.50 रुपयांवर पोहोचली आहे.सर्व गॅस वितरण कंपन्यांच्या दरांत ही दरांत ही वाढकरण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन महिन्यांत गॅसच्या किंमतींत 100 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढून 950 इतकी झाली होती. तर आता पुन्हा एकदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवडण्यात पुन्हा एकदा गॅसच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत.

(हेही वाचाः अमेझॉन, फ्लिपकार्टवर एका वर्षात विकल्या गेल्या इतक्या बनावट वस्तू)

सर्वसामांन्यांच्या खिशाला झळ

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना, आता घरगुती गॅसचे दरही वाढत जात आहेत. त्यामुळे एकप्रकारे रशिया-युक्रेन युद्धाची झळ थेट सर्वसामांन्यांच्या खिशापर्यंत पोहोचत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here