ऑगस्ट महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यानुसार आता लवकरच (LPG Gas Price) घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी घट होणार आहे. गॅस तब्बल दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. नागरिकांना ही सूट सबसिडी स्वरुपात मिळणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करत आहेत. त्यातच केंद्र सरकार घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Price) किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारी आहे.
(हेही वाचा – Amazon कडून भारताच्या झेंड्यानंतर आता काली मातेची विटंबना; भारतात संतापाची लाट)
काही दिवसांपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी (LPG Gas Price) करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानुसार उद्यापर्यंत म्हणजेच बुधवार ३० ऑगस्टपर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
भाजप सरकारचं लक्ष्य आगामी लोकसभा निवडणुका (LPG Gas Price) तर आहेतच. त्यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांवर डोळा आहे. शिवाय तेलंगना राज्यातही याच वर्षी निवडणुका होणार आहे. त्याचा थेट फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं या निर्णयामधून दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community