गॅस सिलिंडरबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरातील गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. महागाईत आणखी तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आतापासून तुम्हाला एलपीजी बुकींगसाठी आणखी रुपये मोजावे लागतील.
सरकारी तेल कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरवर 200 ते 300 रुपयांची सूट देण्यात येत होती. ही सुट आता रद्द करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणा-या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा: महिलेच्या विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल )
या तेल कंपन्यांनी दिले आदेश
देशातील तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल काॅर्पोरेशन आणि HPCL आणि BPCL यांनी माहिती देताना त्यांनी वितरकांना सांगितले आहे की, आतापासून कोणत्याही व्यावयसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही. हा निर्णय 8 नोव्हंबरपासून लागू झाला आहे.
Join Our WhatsApp Community