LPG गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा

जर तुमच्याकडे घरगुती गॅस सिलिंडर कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही बातमी वाचून गॅस ग्राहकांना आनंद होणार हे नक्की. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे क्यूआर कोड आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. या कोडच्या मदतीने ग्राहकांना सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकाला त्याचा थेट फायदा मिळणार आहे.

(हेही वाचा – … तर LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी वीक 2022 मध्ये एलपीजी सिलिंडरची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक योजना मांडली आहे. अनेकदा एलपीजी सिलिंडरबाबत ग्राहकांच्या तक्रारी असतात, त्यात गॅस चोरी, सिलिंडर गळती, सिलिंडरची स्थिती खराब असल्याच्या अनेक तक्रारी असतात, मात्र त्याचे निवारण होत नाही, अशा पद्धतीने प्रत्येक सिलिंडरसाठी एक क्यूआर कोड तयार केला जात आहे, ज्यामध्ये सर्व सिलेंडरशी संबंधित माहिती मिळवता येते. अशा प्रकारे गॅस चोरीला आळा बसू शकतो.

येत्या तीन महिन्यात सर्व घरगुती गॅस सिलिंडरवर क्यूआर कोडची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा एक क्रांतिकारी बदल असून क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण माहिती मिळू शकेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

सिलेंडरवरील क्यूआर कोडचे फायदे

  • एलपीजी सिलिंडरमधून होणारी गॅस चोरी रोखणे हा मुख्य उद्देश
  • चोरलेल्या एलपीजी सिलेंडरचा मागोवा घेणे शक्य
  • सिलिंडरच्या गुणवत्तेचे ऑडिट करणे शक्य
  • या क्यूआर कोडद्वारे तक्रार नोंदवणे आणि हेल्पलाइनचा वापर करणे शक्य

अशा सर्व सुविधा तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरपासून सुरू होणार आहेत.

तीन महिन्यांत सुरू होणार सुविधा 

एलपीजी सिलिंडरवरील क्यूआर कोड प्रणाली तीन महिन्यांत लागू केली जाईल, नवीन सिलिंडरवर आधीपासूनच क्यूआर कोड असतील, परंतु जुन्या सिलिंडरवर स्वतंत्र क्यूआर कोड बसवले जातील, ज्यासह मोबाइल नंबर देखील जोडले जातील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here