गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यात कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला डिसेंबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींची झळ पोहोचणार नाही.
किंमतींमध्ये कोणताही बदल नाही
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या वेबसाईटवर घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 115.50 रुपयांनी कमी करण्यात आले हाते. तसेच गेल्या काही दिवसांपासून 19 लिटर सिलेंडरच्या दरांमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे.
(हेही वाचाः सोने खरेदी करणा-यांसाठी धोक्याची घंटा, केंद्र सरकार लावू शकते ‘हा’ कर)
कसे आहेत दर?
राजधानी दिल्लीत 1 डिसेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही 1 हजार 53 रुपये इतकी आहे. तसेच मुंबईत हे दर 1 हजार 52.50 इतके आहेत. यापूर्वी 6 ऑक्टोबरला 14 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आले होते. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ऑक्टोबर महिन्यात 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1 हजार 744 रुपये असून, मुंबईत या सिलेंडरचे दर 1 हजार 696 रुपये इतके आहेत.
Join Our WhatsApp Community