भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 48.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरही 12 रुपयांनी महागला आहे. या वाढीव किमती आज, मंगळवारी 1ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Gas Price Hike)
(हेही वाचा – १९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी)
सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 39 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तिसऱ्यांदा वाढ केली आहे. गेल्या 3 महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत एकूण 94 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1740 रुपये झाली आहे. यापूर्वी सिलेंडरचे दर 1691. 50 रुपये होती. कोलकाता येथे एलपीजी 1850.50 तर मुंबईत 1692.50 रुपये झाली आहे.
IOCL च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीव्यतिरिक्त इतर महानगरांमध्ये देखील नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १,६०५ रुपये इतकी होती. (LPG Gas Price Hike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community