देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच आता इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिंलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1 हजार 52 रुपये मोजावे लागणार आहेत.
राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1 हजार 53 रुपये, कोलकातामध्ये 1 हाजर 79 रुपये आणि चेन्नईत 1 हजार 68 रुपये मोजावे लागणार आहेत.
( हेही वाचा: खुशखबर…कोरोनाची रुग्ण संख्या आठवड्याभरात पाच हजाराने घसरली, पण…)
पाच किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ
पाच किलोच्या घरगुती सिलेंडर दरातही वाढ करण्यात आली आहे. पाच किलोच्या गॅस सिलेंडर दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली, तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली आहे.
Join Our WhatsApp Community