तेल आणि गॅसच्या किंमतीतील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीला LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात करून ग्राहकाना नवीन वर्षाची भेट दिली आहे. इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.पेट्रोलियम कंपन्यांनी १ जानेवारी २०२४ पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती सुधारित केल्या आहेत. सध्याच्या नवीन दरानुसार १.५ रुपयांनी किमती कमी झाल्या आहेत. (LPG Price)
घरगुती LPG सिलिंडरच्या किंमती जैसे थे ठेवण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या असून काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅसच्या दरात कपात करण्यात आलो होती. तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, दिल्ली ते पाटणापर्यंत व्यावसायिक गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. (LPG Price) यापूर्वीही LPG सिलिंडरच्या किंमती ३९ रुपयांनी कमी झाले होते. त्यांनतर लगेचच परत नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच किंमती कमी करण्यात आल्या असल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (LPG Price)
(हेही वाचा : Ram Temple Threat : राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुखांना उडवण्याची धमकी)
सरकार कडून नवीन वर्षाची भेट
दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती केवळ १.५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. अशा प्रकारे, नवीन दरानुसार मुंबईत १७१० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७०८.५० रुपयांना मिळणार आहे.सध्या घरगुती सिलिंडरची किंमत सध्या मुंबईत ९०२.५० रुपये आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community