आज म्हणजेच शुक्रवार १ डिसेंबर रोजी महिन्याच्या सुरुवातीलाच (LPG Price Hike) एलपीजी सिलिंडर दरात पुन्हा वाढ झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दरांमध्ये काहीशी घट झाली होती. मात्र आता पुन्हा हे दर वाढवण्यात आले आहे.
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो सिलिंडरच्या किंमतीत २१ रुपयांची वाढ केल्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता महाग झाला आहे. (LPG Price Hike)
(हेही वाचा – First QR Code Chowk: गिरगावात पहिला क्यू आर कोड चौक, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन)
5 राज्यों के चुनाव खत्म होते ही बढ़ गए, सिलेंडर के दाम। #Lpgcylinder #Lpg #Pricehikehttps://t.co/DCMJ92QsJx
— Rational Guy ☠ (@Rational__Guy) December 1, 2023
वेगवेगळ्या शहरातील एलपीजीचे दर
याच पार्श्वभूमीवर आता १९ किलोग्रॅम व्यावसायिक (LPG Price Hike) एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्ली येथे १,७९६.५ रुपये आणि मुंबईत १,७४९ रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये याची किंमत १,९६८.५ रुपये आणि कोलकातामध्ये १,९०८ रुपये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price Hike) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community