LPG Price Hike : ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या

79
LPG Price Hike : ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या
LPG Price Hike : ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या

ऐन दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरवर महागाईचा बॉम्ब फुटला आहे. अशा परिस्थितीत आता १ नोव्हेंबर २०२३ पासून १९ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. मात्र १४.२ किलो एलपीजी सिलिंडर म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (LPG Price Hike)

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०१.५० रुपयांनी वाढ केली. १०१.५० रुपयांच्या वाढीनंतर आता राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत १८३३ रुपये झाली आहे. तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ ऑक्टोबरला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २०९ रुपयांनी वाढल्या होत्या. मात्र, सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १५७ रुपयांनी कमी केल्या होत्या.

(हेही वाचा : Maratha Reservation : हसन मुश्रीफांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड; दोघेजण ताब्यात)

१४ किलो LPG सिलिंडरची किंमत किती?
३० ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत वाढवले. यानंतरही या लाभार्थ्यांना १०० रुपयांचा अतिरिक्त लाभ देण्यात आला होता. सध्या सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.