LPG Price : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर 6 रुपयांनी महाग

56
LPG Price : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर 6 रुपयांनी महाग
LPG Price : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर 6 रुपयांनी महाग

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला इंडियन ऑइल (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) सारख्या पेट्रोलियम कंपन्या LPG गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. याच पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या झळा बसल्या आहेत. (LPG Price)

हेही वाचा-Megablock : मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर 13 तासांचा ब्लॉक ; वाचा वेळापत्रक

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आणि अशाप्रकारे, अर्थसंकल्पाच्या (बजेट) दिवशी सरकारने दिलेली सवलत आज मागे घेण्यात आली. शनिवार, १ मार्च २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर सहा रुपयांनी वाढला पण, घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (LPG Price)

हेही वाचा-Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीस सात वर्षाचा मुलगा ; दत्तात्रय गाडेच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १,८०३ रुपयांना उपलब्ध होईल, जो फेब्रुवारीमध्ये १,७९७ रुपयांना होता. त्याचप्रमाणे, मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी १,७५५.५० रुपये मोजावे लागतील, जो फेब्रुवारीमध्ये १,७४९.५० रुपयांना उपलब्ध होता. (LPG Price)

हेही वाचा-DCM Eknath Shinde यांचा उबाठावर हल्लाबोल ; जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

इंडियन ऑइलसह सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नसून सर्वसामान्यांच्या किचनमध्ये वापरला जाणारा सिलिंडर मुंबईत ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे. (LPG Price)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.